गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर व लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दराने यंदा प्रथम ४५०० रुपये प्रतिक्लिंटलचा उच्चांक गाठला आहे. कांद्याचा साठा कमी होत असताना दरात सातत्याने वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मराठवाड्यात गंगापूर तालुक्यात दोन कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. लासूर स्टेशन बाजारपेठ जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथे गंगापूरसह वैजापूर, खुलताबाद, कन्नड व छत्रपती संभाजीनगर तालुक्यांतून शेतमाल येतो. तीन चार वर्षांपासून तालुक्यात रब्बी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे.
त्यामुळे दोन्ही बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरू झाली आहे. यंदा आतापर्यंत दोन्ही बाजार समित्यांत सुमारे १७ लाख ३१ हजार १६६ किंटल कांद्याची खरेदी झाली. त्यात लासूर स्टेशन येथे ११ लाख ७१ हजार ३६, तर गंगापूर येथे पाच लाख ६० हजार १३० किंटल कांदा खरेदी झाला.
गंगापूर येथे १८ ऑगस्टला सरासरी ३, ४२४, तर लासूर स्टेशन येथे ३, ७०० रुपये कांदा हे चार महिन्यांचे पीक आहे. आतापासूनच रब्बी कांद्याची रोपे टाकली जात आहेत. सप्टेंबर ते डिसेंबर या बार महिन्यांच्या काळात टप्याटप्प्याने शेतकरी कांदा लागवड करतात. हाच कांदा फेब्रुवारी व मार्चपासून पुढे निघतो. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे लागवडीला मोठी अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोन्ही बाजार समित्यांत किमान ३२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. जून जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा विक्री झाल्याने आता साठवणूक केलेल्या कांद्यालाच चांगला भाव मिळत आहे. कांदा चाळीसाठी मिळालेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला आहे. पुढील रब्बी कांदा बाजारात येण्यास आणखी सात-आठ महिन्यांचा कालावधी आहे.
- बापूराव जायभाय, तालुका कृषी अधिकारी, गंगापूर
जास्तीत-जास्त भाव कसा मिळेल व त्यांना सुख-सुविधा कथा मिळतील, याकडे आम्ही सर्व बाजार समितीचे संचालक लक्ष देत असून यापुढेही शेतमालाला जास्ताँया पात्र देण्याचा आमचा प्रयत्न राहील. शेतकऱ्याच्या हिताआड येणान्या कोणाचीही गय केली जाणार नाही.
- अर्चना सुकासे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, गंगापूर














